इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील नारायण पेठ येथे असलेले “पुणे मराठी ग्रंथालय” तब्बल 113 वर्ष जुनं असून अगदी 100 वर्षांपूर्वीची मासिक या ग्रंथालयात जतन करून ठेवण्यात आली आहेत. त्याची संख्या आता दोन लाखाच्या वर पोहोचली आहे. मराठी मासिकांना मोठा ऐतिहासिक आणि संस्कृती वारसा असतो हा वारसा जतन करण्याचं काम या ग्रंथालयाच्या माध्यमातून केलं जात आहे.
नारायण पेठेतील पुणे मराठी ग्रंथालय ११३ वर्षे जुनं आहे. प्रख्यात लेखक व वकील एन. सी. केळकर आणि नानासाहेब पौगी यांनी 2 ऑक्टोबर 1911 रोजी स्थापन केलेल्या या ग्रंथालयाचा उद्घाटन विजयादशमीला करण्यात आले. सुरुवातीला हे ग्रंथालय चीट गोपेकर वाडा या खाजगी इमारतीत होते. हा वाडा नंतर पाडण्यात आल्याने 1927 मध्ये त्याच स्थलांतर करण्यात आलं. तोपर्यंत नारायण पेठ अस्तित्वात आली नव्हती. त्यानंतर काही अवधीनंतर हे पुणे मराठी ग्रंथालय नारायण पेठ येथे स्थायिक करण्यात आले. या ग्रंथालयात मराठी व काही इंग्रजी भाषेत अशी अनेक मासिके आहेत. या ग्रंथालयातील ही मासिके सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा आरसा असतात. मागील 100 वर्षातील विविध प्रकारच्या मासिकांचा संग्रह आहे. यामध्ये एक मासिक पाहिलं तर त्याचे 12 महिन्याचे अंक असे विविध प्रकारात संग्रह या ठिकाणी उपलब्ध आहेत.
पुणे मराठी ग्रंथालय हे पुण्यातील नामवंत सार्वजनिक ग्रंथालय आहे. ते शासन मान्य असून त्याला अ वर्ग जिल्हा ग्रंथालय असा दर्जा मिळाला आहे. या ग्रंथालयात 1930 पासून प्रसिद्ध झालेली सर्व मराठी मासिके ही जतन करून ठेवण्यात आले आहेत..