इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच वेध भाजपला लागलं आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदासोबत शहराध्यक्ष बदलण्याची तयारी सुद्धा भाजपमध्ये सुरू झाली आहे. शहराध्यक्ष या पदासाठी अनेक जण इच्छुक असून यंदा भाजप ओबीसी नेत्यावर पुणे भाजप शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवू शकते अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपचे मागील तीन वर्षात अध्यक्ष पाहता मराठा आणि ब्राह्मण या समाजाला प्राधान्य दिल्याच दिसून आलं. यंदा मात्र भाजप ओबीसी नेत्यावर जबाबदारी सोपवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे हे आहेत. त्यांच्या पदाचा कार्यकाळ काही दिवसानंतर समाप्त होणार आहे. आता त्यांच्या जागी ओबीसी चेहऱ्याला संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आल असून या चेहऱ्यामध्ये आमदार योगेश टिळेकर, हेमंत रासने, माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, गणेश बिडकर यांच्या नावाची चर्चा आहे.
दरम्यान महाराष्ट्रात महायुतीची सत्ता पुन्हा एकदा आल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रीपदी वर्णी लागली. यानंतर हे पद रिक्त झाले. भाजपने प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती केली त्यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षात अनेक मोठे बदल करण्यात आले. त्यामध्ये पुण्याच्या शहराध्यक्ष पदांचाही समावेश आहे.