Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे-बंगळुरू महामार्गावर एसटीची दुचाकीला जोरदार धडक; बसने घेतला पेट; दुचाकीस्वार जळून खाक

पुणे-बंगळुरू महामार्गावर एसटीची दुचाकीला जोरदार धडक; बसने घेतला पेट; दुचाकीस्वार जळून खाक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यातील भुईंज हद्दीत एसटीची दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत बस आणि दुचाकीनेही पेट घेतला. यामध्ये दुचाकीवरील व्यक्ती जळून खाक झाली आहे. पलूस डेपोची ही बस असून पुण्यावरून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली आहे. बसमधील प्रवाशांबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्ह्यातील पाचवडमध्ये एसटीची दुचाकीला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की बस आणि दुचाकीनेही पेट घेतला. मात्र, एसटीतील सर्व प्रवासी तात्काळ खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

दुचाकी चालक बसखाली खाली अडकल्याने त्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान, अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच भुईंजचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

त्र्यंबकेश्वरहून पलूसकडे जाणाऱ्या या बसमध्ये अनेक प्रवासी होती. या बसची दुचाकीला जोरदार धडक बसली आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अशातच बसने अचानक पेट घेतला. मात्र, प्रवाशांनी आणि बसचालक आणि कन्डक्टरने प्रसंगवाधान राखत बसमधून वेळीच बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments