इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे | 26 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात हे सर्वाधिक वाहन असलेले शहर आहे.यामुळे चांगले वातावरण लाभलेल्या पुणे शहरातील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचले आहे. पुणे शहरातील प्रदूषणावर तज्ज्ञांकडून नेहमी चिंता व्यक्त केली जात असताना केंद्र सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहे. पुणे शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. देशात सर्वात पहिले पुणे शहरात हा निर्णय लागू होणार आहे.
हायड्रोजन निर्मिती प्रकल्पानंतर..
पुणे शहर वाहन उद्योग क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील ५० टक्के वाहने पुणे शहरात निर्माण होतात. तसेच पुणे शहराचा विस्तार वाढल्यामुळे वाहनांची संख्या वाढली आहे. पुणे शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी कचऱ्यातून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प केंद्र सरकारने सुरु केला. पुणे शहरातील हडपसर परिसरात हा प्रकल्प उभारला जात आहे. त्या इंधनाचा वापर पुणे शहरासाठी करण्यात येणार आहे.
पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक
पुण्यात हायड्रोजन निर्मिती प्रकल्प होत आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या इंधनातून आणि विजेच्या माध्यमातून गाड्या चालवल्या जाणार आहे. हायड्रोजन इंधन आणि इलेक्ट्रीसिटी अशी दुहेरी पद्धत पुण्यासाठी करण्यात येणार आहे. यानंतर पुण्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा हायड्रोजन इंधन आणि विजेवर चालवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने तयारी चालवली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. देशातील सार्वजनिक वाहतूक सेवेवरील पहिला प्रकल्प पुणे शहरात उभा राहणार आहे.