Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पुणे पोलिस आयुक्तांची मोक्कानंतर 'एमपीडीए' कारवाईची शंभरी पूर्णः आतापर्यंत 100 गुन्हेगारांची विविध...

पुणे पोलिस आयुक्तांची मोक्कानंतर ‘एमपीडीए’ कारवाईची शंभरी पूर्णः आतापर्यंत 100 गुन्हेगारांची विविध कारागृहात रवानगी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मागील वर्षभरात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) आणि झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई कडक केली आहे. पुणे शहरातील विविध भागातील शंभर गुन्हेगार विरुद्ध पोलीस आयुक्तांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून त्यांना राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

राजू हनुमंत गायकवाड (वय ३९, रा. गंगानगर, हडपसर, पुणे) या गुन्हेगार विरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्यातंर्गत १०० वी कारवाई करण्यात आलेली आहे. गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे सात गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे सदर भागात राहणारे नागरिक पोलिसांकडे तक्रार देत नव्हते.

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे प्रतिबंध शाखेचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार, उपनिरीक्षक राजू बहिरट, शेखर कोळी, सहायक फौजदार दिलीप झानपुरे, योगीराज घाटगे, अविनाश सावंत, संतोष कुचेकर, सागर बाबरे, अनिल भोंग यांनी ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. गायकवाड याला एक वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे.

आतापर्यंत पुणे शहरातील एकूण ११४ गुन्हेगार टोळ्यांविरुद्ध पोलीस आयुक्तांकडून मोक्का कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारीचा बिमोड करण्याासाठी प्रथमच मोक्का आणि एमपीडीए कायद्याचा प्रभावी वापर करून प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारांना जरब बसली आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments