Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पुणे पोलिस आयुक्तांचा चार्ज स्वीकारला: कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बेसिक पोलिसिंग सोबत सात...

पुणे पोलिस आयुक्तांचा चार्ज स्वीकारला: कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बेसिक पोलिसिंग सोबत सात कलमी कार्यक्रम राबवणार : अमितेश कुमार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बेसिक पोलिसिंग बरोबरच कायदा आणि सुव्यवस्था, गुन्ह्याचा शोध, वाहतूक मॅनेजमेंट, महिला आणि मुलांची सुरक्षा, सायबर गुन्ह्यांबाबत जागृती आणि अटकाव, इकॉनॉमिक्स ऑफेन्स, अमली पदार्थांना पायबंद व्हीआयपी मूव्हेंन्ट हा सात कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्धार नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी व्यक्त केला.

अतिरिक्त पोलिस महासंचालक अमितेश कुमार यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांनी गुरुवारी सायंकाळी रितेशकुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्या नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण तसेच त्यांच्या बरोबर सकारात्मक संवाद ठेवण्याची आमची प्राथमिकता राहील. गुन्हे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, महिलांची सुरक्षा, अंमली पदार्थाचे हॉटस्पॉट आहेत त्याच्याकडे आमचे लक्ष राहील. व्हिजीबल पोलिसींग कसे वाढवता येईल याच्यावर माझा भर असेल. अतिरेकी कारवाया होऊ नये यासाठी आमचे प्राधान्य असेल. सामान्य जनतेला सोबत घेऊन आमचा काम करण्याचा मानस राहील असेही आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

क्राईम नियंत्रणाच्या दृष्टीने कोयत्याचा वापर होत असेल त्यांच्यावर परिणाम कारक कारवाई केली जाईल. त्याबरोबर शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील टॉप २० गुन्हेगारांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाईल. वाहतूक सुरळीत राहवी हा आमचा दृष्टिकोन राहणार आहे. कॅमेरा आधारीत वाहतूक नियत्रंणावरही आमचा भर असेल.

हेल्मेट घालणे आणि सीटबेल्ट लावणे कायद्याने बांधकारक आहे. ट्रिपल सीट आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

हेल्मेट वापरण्याच्या संदर्भात आधी जागृती करण्यात येईल. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. सराईत गुन्हेगारावर मोक्का, स्थानबद्धतेची कारवाई सुरु राहील. कायद्याचा वचक गुन्हेगारांवर राहिला पाहिजे. सायबर गुन्हेगारी संदर्भात मनुष्यबळ वाढविण्यात येईल तसेच खासगी तज्ज्ञाची मदत घेण्यात येईल. पुणे शहर मोठे असून एकत्रितपणे टिम वर्क ने काम करण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच पुण्याचे माजी पोलीस आयुक्त यांनी निरोप समारंभावेळी बोलतांना सांगितले कि, पुणे पोलीस आयुक्त म्हणून १३ महिन्याचा कमी कालावधी होता. पण पुण्यातील क्राईम कमी करण्यासाठी माझ्यासह पुणे पोलीस दलाने चांगले परिश्रम घेतले. दहशतवाद्यांचे इसिस सारखे मोड्यूल मोडून काढण्यात आमच्या कर्मचाऱ्यांच्या मोठा वाटा होता. या सोबत सण उत्सव, कोरेगाव भीमा सारखा सवेंदनशील बंदोबस्त कुठलीही अनुचित प्रकार न घडू देता यशस्वी रीतीने पार पडला. मी पोलीस आयुक्त म्हणून १३ महिने होतो. तरीही मी या शहरात ९ वर्ष विविध जबाबदाऱ्या पार पडल्या. यात पुणेकरांचा मोठा वाट अहे. पुणेकऱ्यानी भरघोस प्रेम दिल्याचे रितेश कुमार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments