Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पुणे पोलिसांच्या आदेशाला गुंडांची केराची टोपली?: परेडनंतरही पुण्यात गुंडांची मुजोरी सुरूच,...

पुणे पोलिसांच्या आदेशाला गुंडांची केराची टोपली?: परेडनंतरही पुण्यात गुंडांची मुजोरी सुरूच, रिल्स व्हायरल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यात गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नयेत असे आदेश पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. दरम्यान, पोलिसांच्या आदेशानंतरही गुन्हेगारांकडून मुजोरी सुरूच आहे. पोलिसांनी गुंडांची परेडही काढली तरीही गुंड पोलिसांचे आदेश जुमानत नसल्याचं समोर आलंय. सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर रिल्स व्हायरल करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर लगेच त्यांनी शहरातील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केलीय. पोलिस आयुक्तालयात मंगळवारी शहरातील सराईत गुन्हेगारांची परेड घेण्यात आली होती. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून सज्जड दम देखील देण्यात आला होता

गुन्हेगार, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स व्हिडिओ गुंडांनी, गुंडांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर वायरल करायचे नाहीत असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश दिले होते. पुणे पोलिसांनी हे जाहीरपणे सांगून काही तास उलटायच्या आतच गुन्हेगारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गुंड नीलेश घायवळ याचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अपलोड झाल्याचे समोर आले आहे.

गुंड नीलेश घायवळ याचे मंत्रालय परिसरातील रिल्स व्हिडिओ, एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे फोटो समोर आल्यानंतर मोठी खळबळ माजली. पुणे पोलिसांनी नीलेश घायवळ याला त्याच्या गँगमधील गुन्हेगारांसह पुणे पोलिस आयुक्तालयात बोलावले. पुन्हा असे फोटो व्हायरल करायचे नाही, रेकॉर्ड करायचे नाही असा दम दिला. सोशल मीडिया अकाउंटची माहिती पोलिसांना कळवायची. फेक अकाउंट कोणी तयार केले असतील तर त्याचीही माहिती पोलिसांना कळवायची असे सांगितले होते. मात्र पोलिसांनी सज्जड दम दिल्याच्या काही तासातच पुन्हा रिल्स वायरल केले जात असल्याचं आढळून आलं आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments