Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे पोलिसांची मोठी कारवाई, अवैध 9 हजार लिटर दारू जप्त

पुणे पोलिसांची मोठी कारवाई, अवैध 9 हजार लिटर दारू जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता मोठा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. पुण्यात नक्की काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यातील गुन्हेगारांची परेड, ड्रग्स कारवाईनंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची अवैध व्यावसायावर मोठी छापेमारी केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी शहराजवळच एक दोन हजार नाही तर तब्बल तब्बल 9000 लिटर दारू जप्त केली आहे. पुणे शहराजवळ तब्बल 9 हजार लिटर दारू केली जप्त.

पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यावसायावर मोठी छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान पुणे शहराजवळ पोलिसांनी मोठा दारूसाठा जप्त केला आहे. ड्रग्स प्रकरणानंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

उरुळी कांचन पोलीसांनी ही कारवाई केली. पुणे शहराजवळ सोरतापवाडी जवळ पोलीसांनी हातभट्टीवर मोठा छापा टाकून जवळपास नऊ हजार लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. सोरतापवाडी भागात पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली.

एका कारवाईत पोलिसांनी जप्त केली 525 लिटर दारू तर दुसऱ्या कारवाइत 9 हजार लिटर हातभट्टी दारूचे कंटेनर जप्त केले. पोलिसांनी याच ठिकाणी छापेमारी करत दारू तयार करण्यासाठी लागणारे पाच हजार लिटर रसायन जप्त केलं आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments