Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे पोलिसांची मोठी कारवाई : ललित पाटील पळून गेल्याची माहिती 3 तास...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई : ललित पाटील पळून गेल्याची माहिती 3 तास उशीरा दिल्याने दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. पुणे पोलीस मुख्यालयातील दोन कर्मचा-यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिले आहे. ललित पाटील पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षास तीन तास उशीरा देणाऱ्या दोन पोलीस कर्मचा-यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.

ड्रग्स माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयात एक्स रे साठी घेऊन जाणारे 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. पुणे पोलीस मुख्यालयातील हे दोघे कर्मचारी आहेत. पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत.

पुण्यातील ससून रुग्णालयात आजारपणाचं कारण देत ड्रग्स रॅकेट चालवणं सुरु होतं. त्यावेळी ससून रुग्णालयातील गेटवर 2 कोटी 14 लाखांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यानंतर ललित पाटील पळून गेल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती वाढली. ससून रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, कारागृह पोलीस, कारागृहातील डॉक्टरांसह ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं आणि सहा जणांना निलंबित करण्यात आलं होतं. ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयात एक्स रे साठी दोन कर्मचारी घेऊन जाणार होते. मात्र हे दोघे ललित पाटील सोबत एक्सरेसाठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. एवढच नाही तर नियंत्रण कक्षास ही माहिती तब्बल तीन तास उशीरा देण्यात आली.

आतापर्यंत या प्रकरणात पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. परंतु चौकशीत दोषी आढळल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसह एकूण 15 जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ललित पाटील आणि त्याच्यासह 15 जणांवर तब्बल 3150 पानांचे चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments