Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे पोलिसांचा FDA, MIDC सोबत पत्रव्यवहार; कुरकुंभ येथील कंपनीवर कारवाईच्या सूचना

पुणे पोलिसांचा FDA, MIDC सोबत पत्रव्यवहार; कुरकुंभ येथील कंपनीवर कारवाईच्या सूचना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांकडून एफडीए, एमआयडीसीसोबत पत्रव्यवहार केला आहे. कुरकुंभ येथील कंपनीवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांनी या पत्रात केल्या आहेत. तिन्ही विभागांना तेथे कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कुरकुंभ येथील मेफेड्रॉन निर्मिती करणाऱ्या अर्थ केम लॅबोरटरीज् कंपनीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी प्रदूषन नियंत्रण महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ आणि अन्न औषध प्रशासनाबरोबर पत्र व्यवहार केला.

कुरकुंभ येथे इतर केमीकल उत्पादनाच्या नावाखाली येथे अमली पदार्थ तयार करण्यात उद्योग सुरू होता. यापूर्वी देखील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत दोन कंपन्यात अमली पदार्थ तयार केले जात असल्याचे पुढे आले होते.

त्यानंतर देखील औद्योगिक विकास महामंडळ, प्रदुषन नियंत्रण महामंडळ आणि एफडीए यांच्या हा प्रकार निदर्शनास कसा आला नाही, हा देखील एक मोठा सवाल आहे. पोलिसांनी अर्थ केम लॅबोरटरीज् ही कंपनी सील केली आहे.

इतिहासातील सर्वात मोठी कारवाई

पुणे पोलिसांनी कुरकुंभ एमआयडीसी, पुण्यातील एका कारखान्यावर छापा टाकून 1100 कोटी रुपयांचे 600 किलोहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी अनेक आरोपींना अटक करण्यात आली. पुणे पोलिसांची आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. एका कारखान्याच्या मालकाला पोलिसांनी डोंबिवली येथून 20 फेब्रुवारीला सकाळी ताब्यात घेतले आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शहरासह देशातील विविध शहरात छापेमारी मोहीम सुरू केली आहे. कारखान्याचे मालक आणि कुरकुंभचे रासायनिक तज्ज्ञ पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी केली जात आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments