Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : अजित पवारांचा पोलीस आयुक्तांना फोन; नेमकी...

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : अजित पवारांचा पोलीस आयुक्तांना फोन; नेमकी काय झाली चर्चा?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे पोर्शे या आलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने सध्या राज्यातील वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कारवाईवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसेच राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांच्यावरही याप्रकरणात आरोप झाले. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांशी यासंदर्भात फोनवरुन चर्चा केल्याचे समोर आले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

पुणे शहरातील या ‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ केसमध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप न जुमानता दोषींवर योग्य त्या कायदेशीर कारवाईचे निर्णय घ्यावेत, अशा सूचना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

कल्याणीनगर परिसरात १८ मे ची मध्यरात्र उलटल्यानंतर पहाटे अडीच वाजता भरधाव आलिशान पोर्शे या कारने दुचाकीस्वार आणि इतर दोन वाहानांन जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. त्यानंतर अल्पवयीन कार चालक पळून जाताना स्थानिक नागरिकांनी त्याला चांगलाच चोप देऊन येरवडा पोलिसांच्या त्याला ताब्यात दिलं.

अल्पवयीन कार चालक वेदांत अग्रवाल हा बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. कार चालवताना तो दारु पिला होता, हे बारमधील सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे. अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्याय मंडळाच्या दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. या सुटीकालीन न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर करून त्याची सुटका केली. काही तासातच आरोपीची सुटका केल्यानंतर राज्यभरातून नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण पाहायला मिळालं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments