इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या दोन्ही गटांत निर्णायक वाद सुरू झाला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शुक्रवारी पुण्यात भेट झाली. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले.
दरम्यान, ही भेट दिवाळीनिमित्त कौटुंबिक असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. दिवाळीनिमित्त दरवर्षी पवार कुटुंबीय बारामती येथे एकत्र येते. यंदा अजित पवार यांनी पक्षाबाहेर पडून सत्ताधारी आघाडीत प्रवेश केल्याने पवार कुटुंबात राजकीय वाद रंगला.. मध्यंतरी दोन्ही पवारांची एका उद्योगपतीच्या घरी भेट झाली, तेव्हाही राजकीय बदलाची चर्चा रंगली होती. पक्षाच्या हक्काबाबत निवडणूक आयोगासमोर दिवाळीनंतर रोज सुनावणी होणार असल्याने दोन्ही गटांत तणाव वाढला आहे. अशा स्थितीत या दोन्ही नेत्यांची झालेली भेट राजकीय क्षेत्रासाठी लक्षवेधी ठरली.