Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजपुणे-नाशिक महामार्गावर लक्झरी बसला कंटेनरची जोरदार धडक, ४०-५० प्रवासी गंभीर जखमी

पुणे-नाशिक महामार्गावर लक्झरी बसला कंटेनरची जोरदार धडक, ४०-५० प्रवासी गंभीर जखमी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः पुणे-नाशिक महामार्गावर आज (दि. ७) पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. पुण्याकडे येणाऱ्या खासगी लक्झरी बसला पाठिंबा मागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील ४० ते ५० प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कंटेनरने दिलेल्या धडकेत बसचा संपूर्ण चक्काचूर झाला असून, ड्रायव्हर सीटही पूर्णपणे खराब झाली आहे.

या अपघाताची तीव्रता इतकी होती की, बसचा समोरील भाग संपूर्ण उद्ध्वस्त झाला. बसमधील प्रवासी हे झोपेत असताना हा अपघात झाल्याने अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. बसच्या काचा फुटल्या असून, प्रवासी थेट रस्त्यावर खाली फेकले गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर पुण्याकडे येणारी खासगी लक्झरी बस वेगात जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने तिला जोरदार धडक दिली. कंटेनरच्या या जबर धडकेमुळे ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटला आणि बस महामार्गावरच उलटली. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर प्रशासनाने तातडीने अपघातग्रस्त वाहनं हटवण्यास सुरुवात केली असून, वाहतूक हळूहळू सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments