Sunday, August 31, 2025
Homeक्राईम न्यूजपुणे-नाशिक महामार्गावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १ कोटी ३२ लाख किमतीचा गांजा केला जप्त...

पुणे-नाशिक महामार्गावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १ कोटी ३२ लाख किमतीचा गांजा केला जप्त !

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाने पुणे- नाशिक महामार्गावर ३२ लाख रुपये किमतीचा २६४ किलो २२६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. पुणे नाशिक मार्गावरील नाणेकरवाडी जवळ एका टेम्पोमध्ये अंमली पदार्थाची वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पेट्रोलिंग कारवाईत टेम्पोची तपासणी केली असता हा गांजा जप्त केला आहे.

या कारवाईत गांजा वाहतूक करणाऱ्या राम व्यंकट पितळे (वय २५) आणि श्रेयश प्रदीप चव्हाण (वय २१) या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या दोघांची आता पोलिसांकडून चौकशी सुरु असून, हा गांजा कुठून आणला व ते कुणाला विक्री करणार होते याची विचारपूस करत आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथक करत आहेत. अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या आरोपींना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

नुकतीच पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बिबवेवाडी, कोंढवा आणि बुधवार पेठ या भागांमधून एकूण २६ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. शहरात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीमुळे आता हा विषय चिंतेचा मुद्दा बनला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments