Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पुणे तिथे काय उणेः स्वतःचे उखळ पांढरे करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यातच...

पुणे तिथे काय उणेः स्वतःचे उखळ पांढरे करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यातच केली चोरी; 4 जण निलंबित

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

स्वतःचे उखळ पांढरे करण्यासाठी पोलिसांनी पोलिस ठाण्यातच चोरी केल्याची गंभीर बाब पुण्यात उजेडात आली आहे. या प्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील 4 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या पोलिसांवर जप्त केलेल्या दुचाकी परस्पर विकल्याचा आरोप आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, लोणी काळभोर पोलिसांनी एका दुचाकी चोराला अटक केली होती. त्याची कसून चौकशी केली असता या चोराला लोणी काळभोर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या 4 पोलिसांनीच काही दुचाकी परस्पर विक्री करण्यास सांगितल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. आरोपी पोलिसांनी या आरोपीला जप्त करण्यात आलेल्या दुचाकी स्क्रॅपमध्ये काढण्यात आल्यामुळे त्या विक्री करण्याचे सांगितले होते. त्यानुसार या आरोपीने त्या दुचाकी विक्री केल्या.

चारही जणांवर निलंबनाची कारवाई

आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वतःचे उखळ पांढरे करण्यासाठी या आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. चौकशीत ही बाब स्पष्ट झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी अनेकदा या पोलिस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले. पण हे कर्मचारी उपस्थित झाले नाही. अखेर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या चारही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलिस उपायुक्तांनी सोमवारी यासंबंधीचे आदेश जारी केले. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे व राजेश दराडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments