Tuesday, December 3, 2024
HomeUncategorizedपुणे जिल्ह्यात पहिल्या चार तासात 15.64 टक्के मतदान; सर्वाधिक मतदान बारामतीत तर...

पुणे जिल्ह्यात पहिल्या चार तासात 15.64 टक्के मतदान; सर्वाधिक मतदान बारामतीत तर…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधासभेच्या सर्व 288 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील सकाळी 11 पर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर येत आहे. पुणे जिल्ह्यात पहिल्याच चार तासात 15.64 टक्के मतदान झाले आहे. तर कसबा विधानसभा मतदारसंघात 18.33 टक्के तर सर्वात कमी मतदान पिंपरी व हडपसर मतदारसंघात 11.46 टक्के झाले आहे. तर बारामतीत 18.81 टक्के सर्वाधिक मतदान झाले आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा निवडणुकीत यंदा काका विरूद्ध पुतणे असा पुढच्या पिढीतील सामना पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय टक्केवारी समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय टक्केवारी

-पिंपरी- 11.46

-चिंचवड- 16.97

-भोसरी – 16.83

-वडगाव शेरी- 15.48

– शिवाजी नगर- 13.21

-कोथरूड- 16.05

-खडकवासला- 17.05

-पर्वती- 15.91

-हडपसर- 11.46

-कँटनमेंट- 14.12

-कसबा – 18.33

-मावळ- 17.92

-बारामती – 18.81

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments