इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि. 20) मतदान पार पडत आहे. संपूर्ण राज्यभरात मतदानाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मतदानदान केंद्रावर सकाळी 7 वाजल्यापासूनच रांगा लागल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या 288 मतदारसंघासाठी मतदान पार पडत असून निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. दरम्यान दुपारी एक पर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर येत आहे.
यामध्ये केवळ पुणे जिल्ह्याचा विचार केला, तर पुणे जिल्ह्यात एक वाजेपर्यंत 21 विधानसभा मतदारसंघात 29.03 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. सर्वात कमी मतदान पिंपरी विधानसभा मतदारसंघात 21.34 टक्के, तर सर्वाधिक 35.63 टक्के मतदान हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात झाले आहे. तसेच जिल्ह्यात चर्चेत असणाऱ्या शिरूर हवेलीमध्ये 28.66 टक्के, तर बारामतीमध्ये 33.78 टक्के मतदान झाले आहे.