Thursday, October 31, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत १०९ अर्ज अवैध; ६४८ अर्ज ठरले वैध; येत्या...

पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत १०९ अर्ज अवैध; ६४८ अर्ज ठरले वैध; येत्या ४ नोव्हेंबरला चित्र होणार स्पष्ट

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व २१ मतदारसंघांत ६४८ अर्ज वैध, तर १०९ अर्ज अवैध ठरले आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि. २९) रोजी ७५७ अर्ज जिल्हा निवडणूक शाखेकडे दाखल झाले. आता याबाबतचे अंतिम चित्र येत्या ४ नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील २१ मतदार संघातील १ हजार २७२ उमेदवारांनी २ हजार ५०६ अर्ज खरेदी केले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात दाखल केलेल्या अर्जाची संख्या खूपच कमी आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments