Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, अति मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर...

पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, अति मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमीत केले आहेत.

अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये, तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, याकरीता जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच घराबाहेर बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments