इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेतला असून सुमारे 4000 अंगणवाडी सेविकांना आता 1 कोटी 92 लाख रुपयाचां निधी दिला जाणार आहे. हा भत्ता येत्या काही दिवसात अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीणयोजना सुरू केली होती. या योजनेत लाभार्थी महिलांचे अर्ज भरूनघेण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांमार्फत करण्यातआले. अर्ज भरण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम केले.प्रत्येक अर्जासाठी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता संबंधित कर्मचाऱ्यांनादेण्याच्या सूचना होत्या. यानुसार आता या बहिणींचे अर्ज भरणाऱ्याअंगणवाडी सेविका, मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्गमोकळा झाला आहे. राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना एक कोटी92 लाख रुपयांचा निधी दिला आहे. लवकरच त्यांच्या खात्यातप्रोत्साहन भत्ता जमा होणार आहे.
या लाडकी बहिण योजनेचे अर्ज जिल्ह्यातील सेविकांसह पर्यवेक्षिकांनी 3 लाख 84 हजार 512 अर्ज भरले आहेत. त्यासाठी 1 कोटी 92 लाख 25 हजार 600 रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे. हा निधी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आता पुढील टप्प्यात हा निधी कोषागारात पाठवून त्याद्वारे रक्कम उपलब्ध झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.