Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे ग्रामीणच्या एलसीबीची कारवाई: एसटी स्थानकावर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे दागिने...

पुणे ग्रामीणच्या एलसीबीची कारवाई: एसटी स्थानकावर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे दागिने चोरणारी महिला गजाआड; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

एसटी स्थानकावर बसमध्ये बसण्याचा बहाणा करुन गर्दीचा फायदा घेत प्रवशांचे बॅगेतील सोन्याचे दागिने व रक्कम चोरी करणारी सराईत महिला आरोपी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलिसांच संयुक्त कारवाईत हाती लागली आहे.

अश्विनी अवि भोसले (वय-23, रा. माही. जळगाव, ता. कर्जत, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या ताब्यातून तब्बल 11 लाख 64 हजार रुपयांचे 235 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला वेग

याबाबत माहिती अशी की, 2 मार्च रोजी अलका बनकर (वय-59, रा. अकलूज, ता. माळशिरस, सोलापूर) हे पुणे येथे जाण्याकरिता इंदापूर एसटी स्थानक येथून एसटी बस मध्ये बसून पुण्याकडे निघाल्या होत्या. एसटी बस मध्ये चढताना त्यांचे बॅगेतील लहान पर्स कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेऊन चोरुन नेली होती. त्यात साडेपंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 8 लाख रुपयांचा मुद्देमाल होता. याबाबत इंदापूर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीचा शोध सुरु केला.

सीसीटीव्ही तपासासून सत्य आले समोर

सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामार्फत चालू असताना सीसीटीव्ही तपासणी करुन तसेच गुन्हयाचे कार्यपध्दतीचा अभ्यास पोलिसांनी केला. त्यावेळी सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील महिला अश्विनी भोसले हिने केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तिचा शोध सुरु करण्यात आला असता, कर्जत परिसरात ती आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार सापळा रचून तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन विश्वासात घेत चौकशी केली. त्यावेळी तिच्यावर खेड, इंदापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गुन्हयांची उकल झाली. तिच्या ताब्यातून चोरीचे 335 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 11 लाख 64 हजार मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपी महिलेवर 5 ठिकाणी गुन्हे दाखल

आरोपी विरोधात यापूर्वी जामखेड, करमाळा, पिंपरी, हडपसर पोलिस ठाण्यात चोरीचे अशाप्रकारचे एकूण पाच गुन्हे दाखल आहे. सदरची कामगिरी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments