Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे कार अपघात प्रकरण : विशाल अग्रवालसह ६ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन...

पुणे कार अपघात प्रकरण : विशाल अग्रवालसह ६ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात आलिशान कारने दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपी अल्पवयीन मुलगा, वडील यांच्यासह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची घटना होऊन काही तास होत नाही तोवर अल्पवयीन आरोपी मुलास बाल न्याय मंडळाने जामीन दिला. तर मुलाच्या वडिलांसह अन्य ५ आरोपींना (२४ मे) आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, अल्पवयीन आरोपी मुलाला काही तासात जामीन मिळाल्याने पुण्यासह राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा बाल न्याय मंडळासमोर अर्ज केल्यावर अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करत १४ दिवसांकरीता बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

तसेच अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून विशाल अग्रवालला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, विशाल अग्रवालला पोलीस कोठडीची आवश्कता नाही, असं पुणे सत्र न्यायालयाने म्हटले आहे.

अल्पवयीन आरोपीचे वडील व बांधकाम व्यावसायिक असलेले विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल, कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर, ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगळे, कर्मचारी नीतेश धनेश शेवानी आणि ब्लॅकच्या बार काउंटरच व्यवस्थापक जयेश सतीश गावकर यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.

तर आज अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह सहा जणांची कोठडी संपल्याने त्या सर्वांना पुणे न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह सहा जणांना ७ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments