Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजपुणेकर सोडणार सुटेकचा श्वास ! पुण्यातील 'या' १७ मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार,...

पुणेकर सोडणार सुटेकचा श्वास ! पुण्यातील ‘या’ १७ मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार, महापालिकेचा मोठा निर्णय..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोरआली आहे. पुणेकरांची नेहमीच्याच झालेल्या वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. कारण, पुणे शहरातील तब्बल १७ रस्ते सुपरफास्ट होणार आहेत. यासाठी पुणे महानगर पालिकेकडून शहरातील १७ रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. या १७ रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवून, चेंबर दुरूस्ती, अनावश्यक ठिकाणचे ग्रेड सेपरेटर काढून त्यांचे नव्याने डांबरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना सहन करावा लागणारा वाहतूक कोंडीचा त्रास दूर होणार असून प्रवास आणखी सहज आणि सुसाट होणार आहे.

१७ रस्ते होणार सुपरफास्ट

पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करून वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी पुणे महापालिकेने आता नव्याने १७ रस्त्यांची निवड केली आहे. त्यासाठी ‘मिशन १७’ हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आता पुण्यातील आणखी १७रस्ते सुपरफास्ट होणार आहेत. या मिशनअंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीला वेग मिळावा आणि प्रामुख्याने अतिक्रमणे काढून रस्त्यांची डागडुजी, त्यावर डांबरीकरण करून रस्ते विकसित केले जाणारा आहेत.

प्रवास होणार वेगवान

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यात येऊन वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेले ‘मिशन १५’ पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता महापालिकेकडून शहरातील १७ रस्त्यांची निवड करून ‘मिशन १७’ राबवण्यात येणार आहे. या रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवून, चेंबर दुरुस्ती, अनावश्यक ठिकाणचे ग्रेड सेपरेटर काढून त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात येणार आहे.

रस्त्यांचा सर्व्हे सुरू

‘मिशन १७’ अंतर्गत निवड करण्यात आलेल्या सर्व रस्त्यांचा आता सर्व्हे सुरू केला गेला आहे. या रस्त्यांवरील कोणकोणत्या बाबींवर कामे करावी लागणार आहेत, त्याची यादी करण्यात येत असून त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारून वाहतुकीला गती मिळणार आहे.

‘ते’ १७ रस्ते कोणते?

सासवड रस्ता, जुना एअरपोर्ट रस्ता, कात्रज-मंतरवाडी बायपास, आळंदी रस्ता, जुना पुणे-मुंबई हायवे, शास्त्री रस्ता, नेहरू रस्ता, टिळक रस्ता, साधू वासवानी रस्ता, बंडगार्डन रस्ता, डॉ. आंबेडकर रस्ता, एम. जी. रस्ता, प्रिन्स ऑफ बेल्स रस्ता, कोंढवा मुख्य रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सेनापती बापट रस्ता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments