इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : दहीहंडी उत्सवानिमित्त शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. विशेषतः शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, टिळक रोडवर सायंकाळी ५ ते दहीहंडी फुटेपर्यंत बुधवार चौक ते दत्तमंदिर चौक तसेच बेलबाग चौक ते सेवासदन चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौ. मंडई चौक (बाबू गेनू चौक), साहित्य परिषद चौक, नवी पेठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी यासंबंधीचे आदेश शनिवारी (दि. २४) संध्याकाळी दिले आहेत.
असे असतील पर्यायी मार्ग ?
• छत्रपती शिवाजी रोडवरून स्वारगेटला जाण्यासाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली टिळक चौक पुढे टिळक रोडने/शास्त्री रोडने इच्छितस्थळी जातील.
• पुरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने इच्छितस्थळी जाता येईल. तसेच सणस पुतळा चौकामधून सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छितस्थळी जातील.
•स.गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाण्यासाठी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जाता येईल.
• बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक सोडण्यात येईल. आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.
• रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येत असून, पर्यायी मार्गाचा वापर करावा.
•सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे वाहतुकीकरिता बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून इच्छितस्थळी जातील.
• शिवाजी रोडवरून जिजामाता चौकातून गणेश रोडने दारुवाला पुलाकडे जाणारी वाहतूक ही गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक पवळे चौक जुनी साततोटी पोलिस चौकी मार्गे इच्छितस्थळी जाईल.
• गणेश रोडवरील संपूर्ण वाहतूक ही दारुवाला पूल येथून बंद राहील. तसेच देवजीबाबा चौक व फडके हौद चौकात वाहतूक बंद करण्यात येईल. वाहनचालकांनी अपोलो टॉकिज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल, दुधभट्टी या मार्गाचा वापर करावा.