इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : धुलीवंदन हा सण मोठ्या उत्साहात पुणे शहरात साजरा केला जातो. या सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पुणे मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. दुपारी 3 नंतर मेट्रो सेवा पुन्हा सुरळीत होणार आहे आणि रात्री अकरा वाजेपर्यंत प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे.
शहरात धुळवडीमुळे नागरिक रस्त्यावर एकत्र येत मोठ्या प्रमाणात रंगांची उधळण करून हा सण साजरा करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत जरी मेट्रो सेवा बंद असली तरी दुपारनंतर पुन्हा ती सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे तीन ते अकरा वाजेपर्यंत नागरिकांना या पुणे मेट्रो सेवेचा लाभघेता येणार आहे.
धुलीवंदनाच्या दिवशी मेट्रो प्रवासाची पूर्वतयारी करून नियोजन करावे तसेच ज्या प्रवाशांना सकाळच्या वेळेत प्रवास करायचा आहे, त्यांनी अन्य पर्यायाचा विचार करावा असे आवाहन देखील पुणे मेट्रोच्या वतीने नागरिकांना करण्यात आलं आहे.