Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट; पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला केले अलर्ट

पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट; पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला केले अलर्ट

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : खडकवासला धरणातून पुणे महापालिका दररोज १ हजार ५०० एमएलडी पाणी घेत आहे. धरणातील उपलब्ध साठा पाहता आतापासूनच पाणी बचतीचे धोरण अवलंबा. दैनंदिन पाणी वापर १२५० ते १३०० एमएलडीपर्यंतच करावा, अशी सूचना पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला केली आहे. यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे.

खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर आणि भामा आसखेड या पाच धरणातून पुण्याला पाणीपुरवठा केला जातो. खडकवासला प्रकल्पात २४.१० टीएमसी पाणीसाठा आहे, त्यापैकी ८.५४ टीएमसी पाणी रब्बी हंगामासाठी आरक्षित आहे. हा पाणीसाठा वजा केल्यास धरणामध्ये १५.५० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पण, खडकवासला धरणातून पुणे महापालिका दररोज १ हजार ५०० एमएलडी पाणी घेत आहे. त्यामुळे शहरात जूनपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

पुणे महापालिकेने रोज अडीचशे ते तीनशे एमएलडी पाण्याची बचत करावी. दैनंदिन पाणी वापर १२५० ते १३०० एमएलडीपर्यंत करावा. त्यामुळे जून-जुलैपर्यंत पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी महापालिकेने डिसेंबरपासूनच पाण्याची बचत करावी, अशी सूचना पुणे महापालिकेला केली आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments