इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : होळीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी मोठी माहिती समोर आली आहे. होळीसाठी शहरात वृक्षतोडले जातात मात्र आता याल प्रतिबंध घालण्यासाठी महानगपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहरात होळीसाठी वृक्षतोड करताना आढळल्यास संबंधित नागरिकांना एक लाख रुपयांचा दंड केला जाणार असल्याचा इशारा नगरपालिकेने केला आहे.
शहरतील वृक्ष तोडीला आळा घालण्याासाठी महापालिकेने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात आज (13 मार्च) ला होळी साजरी केली जाणार आहे. होळीसाठी शेणाच्या गोवऱ्या, तसेच वाळलेल्या लाकडांचा वापर केला जातो. मात्र, बऱ्याच ठिकाणी झाडे बेकायदा तोडून ते विकली जातात. होळीसाठी शहरालगत असलेल्या वन विभागाच्या हद्दीमधील, नदीकाठ आणि आजूबाजूच्या परिसरातील झाडे होळीसाठी तोडली जातात. अश्या तक्रारी महानगरपालिकेकडे आल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने होळीसाठी झाडे तोडणारास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम २०२१ या कायद्यानुसार, कोणतीही परवानगी न घेता झाडे जाळणे, तोडणे किंवा कोणत्याही प्रकारे झाडाला हानी पोहचविणे, असे कृत्य करणे हा कायद्यांवये गुन्हा आहे. त्यामध्ये एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या दंडाची तरतूद आहे. यामुळे आता महानगरपालिकेने झाडे तोडणाऱ्याला एक लाख रुपयांचा दंडाचा निर्णय घेतला आहे.
शहरात बेकायदा वृक्षतोड होत असल्यास नागरिकांनी हेल्पलाइनवर तक्रार करावी असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी म्हटले आहे.
अशी करता येईल तक्रार…
जर बेकायदेशीररित्य वृक्षतोडीचे प्रकार शहरात घडत असल्यास याची माहिती नागरिकांनी महानगरपालिकेला द्यावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा. नागरिकांनी 18001030222 या टोल फ्री क्रमांकावर, 9689900002 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार करावी.