Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजपुणेकरांनो, लक्ष द्या; 'या' परिसरात आज पाणीपुरवठा राहणार बंद...

पुणेकरांनो, लक्ष द्या; ‘या’ परिसरात आज पाणीपुरवठा राहणार बंद…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पावसाळा असताना सुद्धा पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी ससून रुग्णालय परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटल्याने आजूबाजुच्या परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

त्याकारणामुळे आज शुक्रवारी (16 ऑगस्ट) या वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्यातील काही पेठ भाग व पुणे स्टेशन परिसरातील पाण्याचा पुरवठा हा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

या भागात बंद राहणार पाणीपुरवठा..

सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गारपीर वस्ती, सोमवार पेठ पोलिस लाइन, पुणे स्टेशन परिसर, पांढरा गणपती परिसर, बरके आळी, सारस्वत कॉलनी, घोडमाळा परिसर, ससून हॉस्पिटल परिसर, संचेती हॉस्पिटल ते मोदीबागपर्यंत, जेधे पार्क, जुना पुणे-मुंबई रस्ता, संगम पूल ते मुळा रोडपर्यंत, ताडीवाला रोड झोपडपट्टी व जुना बाजार परिसरात पाणी बंद राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments