इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी (२२ फेब्रुवारी) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. शहा हे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. शहा यांच्या दौऱ्यानिमित्त बाणेर भागातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. लष्कर भागातील रेसकोर्सजवळील पाण्याची टाकी परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. पाण्याची टाकी ते टर्फ क्लब रस्ता वाहतुकीस तात्पुरत्या स्वरुपात दुतर्फा करण्यात येणार आहे.
वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी के आहे. शनिवारी रेसकोर्सजवळील पाण्याची टाकी ते टर्फ क्लबर रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दुतर्फा करण्यात येणार आहे.
असे असतील वाहतूक बदल..
बाणेर रस्ता भागातील वाहतूक बदल..
गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकातून (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) बाणेर रस्त्याने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकातून डावीकडे वळावे. तेथून भुयारी मार्गाने इच्छितस्थळी जावे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून बाणेरकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी बालेवाडी जकात नाका चौकातून डावीकडे वळून हाय स्ट्रीटमार्गे इच्छितस्थळी जावे. पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाऊ नये. पाषाण रस्त्याने चांदणी चौक किंवा विद्यापीठ चौकातून औंधमार्गे इच्छितस्थळी जावे.
अवजड वाहनांना असणार बंदी
केंद्रीय मंत्री अमित शहा दौऱ्यानिमित्त शनिवारी विद्यापीठ चौक ते चांदणी चौक दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. विद्यापीठ चौक ते बाणेर परिसरातील राधा चौक, बाणेर रस्ता, तसेच विद्यापीठ चौक ते औंध येथील राजीव गांधी पूल दरम्यान सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून शहर परिसरात सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.