Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुणेकरांनो पाणी जपून वापरा...! गुरुवारी 'या' भागात पाणी पुरवठा राहणार बंद

पुणेकरांनो पाणी जपून वापरा…! गुरुवारी ‘या’ भागात पाणी पुरवठा राहणार बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणेकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे. पुणे शहरावरील पाणी कामातीचे संकट तूर्तास टळले असले तरी, शहरातील गुरूवारी ३० मे रोजी वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग येथील विद्युत / पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्ती व अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

याशिवाय धनकवडी येथील शिवशंकर चौक येथे कलवर्टचे काम सुरु असल्यामुळे सदर कामामध्ये अडथळा ठरणारी ७९६ मीमी व्यासाची पाईप लाईन शिफ्ट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणची पंपींग यंत्रणा बंद ठेवावी लागणार असल्याने

या भागातील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार (३१ मे) रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे अशी विनंती महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग :

वडगाव जलकेंद्र परीसर हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर

राजीव गांधी पंपिंग सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदा माता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर मधील भाग क्रमांक एक व दोन, राजेश सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग 38 मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग 41 व येवलेवाडी परिसर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments