इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीवरून अनेकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढता विस्तार पाहता पुणेकरांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. गेल्या काही महिन्यापूर्वीच वाहतूक कोंडीत असलेल्या शहरांची नावे एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार पुणे शहर जगात चौथे तर देशात तिसरे वाहतूक कोंडीने त्रस्त असलेले शहर म्हणून समोर आले. शहरात दरवर्षी वाहनांच्या विक्रीत झपाट्याने वाढ होत आहेत. सन 2024-25 या आर्थिक वर्षात तब्बल 3 लाख 7 हजार 299 वाहनांची नोंद पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरात तब्बल 39 लाखांपेक्षा जास्त वाहनांची नवीन भर झाली आहे.
पुणे शहरात रस्त्यावरून वाहन चालवणे ही मोठी कसरत असते याचे कारण म्हणजे वाढलेली वाहनांची संख्या. 2024-25 या आर्थिक वर्षात वाहनांच्या विक्रीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना दिवसेंदिवस करावा लागत आहे. वाढत्या वाहनामुळे शहरातील वाहतूक मंदावलेल्या अवस्थेत आहे. दरम्यान मागच्या आणि आत्ताच्या वाहन खरेदीत मोठा फरक पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार ई वाहन खरेदी करण्याचे आवाहन नागरिकांना करत आहे. त्यानुसार यंदा एक लाखाहून अधिक वाहन खरेदी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.