Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजपुणेकरांना पाण्याचा फटका; "या" तारखेपासून पाणी बंद करण्याचा "जलसंपदाचा "इशारा

पुणेकरांना पाण्याचा फटका; “या” तारखेपासून पाणी बंद करण्याचा “जलसंपदाचा “इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : गेल्या तीन ते चार वर्षापासून पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागांमध्ये पाणीपट्टीचा आकारणीवरून जोरदार वाद निर्माण झाला आहे.. आता याचा फटका पुणेकरांना बसला असून पुणे महापालिकेकडे जलसंपदा विभागाची 726 कोटी 12 लाख रुपयांची थकबाकी आहे. ती तातडीने भरणे गरजेचे आहे.. अन्यथा 25 फेब्रुवारीपासून शहराचे पाणी बंद केले जाईल असा इशाराच आता जलसंपदा विभागाने दिला आहे.. त्यामुळे पुणेकरांना पाण्याचा चांगलाच फटका बसणार आहे..

पुणे शहराची वाढणारी लोकसंख्या आणि वाढलेली हद्द या कारणामुळे महापालिकेला मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाण्याचा साठा धरणातून घ्यावा लागत असतो… मात्र जलसंपदा विभाग त्यांचे बिल हे महापालिकेला औद्योगिक दराने देत आहे. त्यामुळे महापालिकेचे 150 ते 200 कोटी रुपये येणार बिल आता 700 कोटीपर्यंत गेले आहे.. जलसंपदा विभागाने थकबाकी लवकरात लवकर भरण्याचा आदेश दिला असला तरी दुसरीकडे पाणीपट्टीची थकबाकी ही 160 कोटी रुपये असून नियमितपणे पाणीपट्टी भरण्यात येत असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे… त्यांच्या या दाव्यामुळे आता महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे…

शहरातील नागरिकांना पाणी देण्यासाठी महापालिका जलसंपदा विभागाच्या वतीने खडकवासला, भामा आसखेड धरणातून पाणी दिले जाते.. शहरात एकही प्रक्रिया उद्योग नसताना जलसंपदा विभागाने त्यांची पाणीपट्टी वसूल करण्यासाठी महापालिकेला बिल दिले आहे.. आता या थकबाकीचा वाद लवकरात मिटणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments