Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुणेकरांच्या खिशाला कात्री...! सीएनजी दरामध्ये दीड रुपयांनी वाढ; 'या' दराने होणार विक्री

पुणेकरांच्या खिशाला कात्री…! सीएनजी दरामध्ये दीड रुपयांनी वाढ; ‘या’ दराने होणार विक्री

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात सीएनजीच्या एका किलोमागे तब्बल दीड रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण तळेगाव आणि हिंजवडी या परिसरातील सीएनजीच्या दरामध्ये मंगळवारी (दि. ९) मध्यरात्रीपासून वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ने घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता सीएनजीच्या एका किलोसाठी तब्बल ८५ रुपये मोजावे लागणार आहेत. काही दिवसांत बजेट सादर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सीएनजीचे दर वाढल्याने सीएनजी वाहनधारकांना चांगलाच फटका बसणार आहे.

दरम्यान, देशभरातील नागरिक महागाईने होरपळत असून पेट्रोल डिझेल ते गॅस सिलेंडरचे दर हे गगनाला भिडले आहेत. त्यामध्ये भाज्यांचे दर देखील कडाडले आहेत. अशातच आता सीएनजीची भर पडल्याने नागरिकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. स्वस्त आणि पर्यावरण पूरक म्हणून सीएनजी गाडीचा पर्याय परवडणारा असल्याने याला अनेक नागरिकांनी पसंती दिली आहे. मात्र, महानगर गॅस लिमिटेडने मंगळवार पासून नवे दर लागू केले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ६ मार्च रोजी सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २.५० रुपयांची कपात केली होती. आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली असून वाहनधारकांना मंगळवार (दि. ९) पर्यंत प्रतिकिलोसाठी ८३.५० रुपये मोजावे लागत होते. मात्र, मंगळवारी (दि. ९) मध्यरात्रीपासून प्रतिकिलोसाठी ८५ रुपये मोजावे लागणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments