इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमीच ओळखले जातात, त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अशातच आता पुण्यातील कारच्या मागे लिहलेला संदेश सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या कारच्या पाठीमागे “इथे शिकाल तर कुठेही टिकाल #नवले ब्रीज” असं लिहलं आहे. म्हणजेच पुण्यात असणारा नवले ब्रीज इतका खतरनाक आहे की एकदा का तुम्ही या ब्रीजवर गाडी चालवायला शिकला की मग तुम्हीही कुठेही गाडी चालवू शकता. असं यातून सांगितल आहे.
पुण्यातील नवले ब्रीज हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी दिवसाला अपघात होत असतात. आता या ब्रिजवरून जाताना कारच्या मागे लिहिलेला संदेश खतरनाक व्हायरल होत आहे.
देशभरातील लोक मजेदार कोट्स लिहिण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या मागे लिहिलेल्या ओळी सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण सध्या सोशल मीडियावर एका मजेशीर ओळीमुळे ट्रक नव्हे तर कार चर्चेचा विषय बनली आहे.
पुणेकरांचे पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या या जगजाहीर आहेत. पूर्वी ट्रक किंवा मालवाहू जड वाहनाच्या मागे लिहिलेले संदेश अनेकांचे लक्ष खेचून घेत होते. आता या कारणावर लिहिलेला संदेश सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.