Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुणं हादरलं...! प्रेयसीने संपर्क तोडल्याने प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

पुणं हादरलं…! प्रेयसीने संपर्क तोडल्याने प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रेयसीने संपर्क तोडल्याच्या रागातून तरुणाने तिच्या बहिणीवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.19) मध्य रात्री दोन वाजण्याच्या सुमारास शहरातील गंज पेठ परिसरात घडली आहे. या घटनेत प्रेयसीची बहिण जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत 18 वर्षीय तरुणीने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून प्रियकर ऋषी बागुल (रा. गंजपेठ, पुणे) आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेने पुणे शहर हादरुन गेले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी यांच्या बहिणीचा घटस्फोट झाला आहे. आरोपी ऋषी बागुल आणि तिचे प्रेम संबंध आहेत. त्या दोघांमध्ये वाद झाल्याने फिर्यादी यांच्या बहिणीने ऋषीचा फोन ब्लॉक करुन त्याच्यासोबत संपर्क करणे टाळले. तसेच ती भेटत नसल्यामुळे ऋषीला राग अनावर झाला. दरम्यान, आरोपी ऋषी बागुल हा त्याच्या मित्रासोबत रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या राहत्या घरी आला होता.

यावेळी प्रेयसीच्या बहिणीसोबत त्याचे वाद सुरू झाले. ऋषी बागुल याच्या प्रेयसीने त्याच्याशी संपर्क कमी करुन त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने त्याला राग आला. याच गोष्टीचा राग मनात धरून त्याने त्याच्याकडील पिस्टल प्रेयसीच्या बहिणीवर रोखून जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. मला जर ती मिळाली नाही तर मी कोणालाही सोडणार नाही अशी धमकीही त्याने यावेळी दिली, तसेच त्याने प्रेयसीच्या राहत्या घराला बाहेरुन कडी लावून दोघेही निघुन गेले.

या घटनेत फिर्यादी यांची दुसरी बहीण किरकोळ जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खडक पोलिसांनी याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments