Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजपुणं हादरलं...! दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देऊन रात्रभर बलात्कार; तिघांवर गुन्हा

पुणं हादरलं…! दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देऊन रात्रभर बलात्कार; तिघांवर गुन्हा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथून एक संतापजनक घटना समोर येत आहे. दोन अल्पवयीन मुलींना लॉजवर नेऊन ड्रगचे इंजेक्शन देऊन तसेच बिअर आणि दारु प्यायला देऊन रात्रभर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी अल्पवयीन मुलींचे अक्षरशः लचके तोडल्याचा भयानक आणि किळसवाणा घडला आहे. ही घटना मंगळवारी (दि.14) रात्री खेड तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी तीन नराधमांवर गुन्हा दाखल करण्यात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आरोपींवर खेड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेतले आहे. तर घटनेतील मुख्य आरोपी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेत एक अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या अल्पवयीन मुली राजगुरुनगर परिसरात राहत असून महाविद्यालयात शिकत आहेत. मंगळवारी रात्री आरोपींनी दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्स दिले आणि त्यांच्यावर रात्रभर बलात्कार केला. बुधवारी सकाळी नशेत असलेल्या मुली आपल्या घरी परतल्या. त्यावेळी त्यांच्या पालकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे म्हणाले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान, या घटनेतील फरार मुख्य आरोपी हा ड्रग्स पुरवणारा सुत्रधार आहे. त्याने आतापर्यंत किती जणांना ड्रग्ज पुरवले आहेत, याचा तपास खेड पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments