Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजपुणं पुन्हा हादरलं! फायनान्स कंपनीचे मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांची निघृण हत्या, 12...

पुणं पुन्हा हादरलं! फायनान्स कंपनीचे मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांची निघृण हत्या, 12 तासांत दोन खुनांच्या घटना…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली. असताना आता पुण्यातील हडपसर भागात मध्यरात्री फायनान्स कंपनीच्या मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांचा निर्घण खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव कुलकर्णी हे पुण्यातील एक प्रतिष्ठीत फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. रविवारी रात्री वासुदेव कुलकर्णी हे त्यांच्या घरासमोर शतपावली करत असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. या घटनेनंतर परिसरात पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणी तपास करण्यास सुरवात केली आहे. हल्लेखोरांना हल्ला करुन घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. दरम्यान, पोलीसांना त्यांच्या परिसरात कडक बंदोबस्त केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, परंतु पोलीसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलीसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र वासुदेव कुलकर्णी यांच्या खुनाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

दरम्यान, पुणे शहरात 12 तासांतच दोन खुनांच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments