इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे शहर व उपनगरातून महाशिवरात्रीनिमित्त निळकंठेश्वर, बनेश्वर, घोराडेश्वर मंदिर पायथा या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची संख्या मोठी असते. यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून भाविकांसाठी जादा बसेसचे नियोजन करण्यात आलं आहे. यामध्ये कात्रज सर्पोद्यान ते बनेश्वर (चेलाडी फाट्यापर्यंत), स्वारगेट मुख्य स्थानक स्वारगेट ते निळकंठेश्वर (बीएसएफ सेंटर, पानशेत), निगडी (पवळे चौक) ते घोराडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या मार्गावर पीएमपीच्या जादा बस धावणार आहेत.
या महाशिवरात्रीनिमित्त पुणे महानगर परिवहन मंडळाच्या 61, 296,296 अ, 523, 228,305,341,342,368 आणि 371 या नियमित बसमार्गावरही वाहतूक सुरू राहणार नाही. पीएमपीच्या प्रशासनाने भाविकांना या विशेष बससेवेचां लाभ घेण्याच आव्हान केल आहे. या महाशिवरात्रीनिमित्त निगडी (पवळे चौक) येथून घोराडेश्वर मंदिर पायथ्याकडे (शंकरवाडी) जाण्याकरिता पहिली फेरी पहाटे ५.२० वाजता असून, या ठिकाणी जाण्याकरिता नियमित सुरू असणाऱ्या बससह एकूण २४ बस धावणार आहेत.
बनेश्वरसाठी पहिली बस पहाटे साडेपाच वाजता सुटणार आहे. नियमित सुरू असणाऱ्या नऊ बससह यात्रेसाठी दोन जादा बस अशा एकूण ११ बस सरासरी २० मिनिटांच्या दरम्यान उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
स्वारगेट मुख्य स्थानकावरून निळकंठेश्वर येथे जाण्याकरिता पहिली फेरी पहाटे साडेतीन वाजता सुटणार आहे. नियमित सुरू असणाऱ्या दोन बस व यात्रेसाठीच्या १२ जादा बस अशा एकूण १४ बस या मार्गावर धावणार आहेत.