Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजपीएमपीएलच्या महिला वाहकाकडे डेपो मॅनेजरने केली शरीर सुखाची मागणी; महिलेने कार्यालयातच अंगावर...

पीएमपीएलच्या महिला वाहकाकडे डेपो मॅनेजरने केली शरीर सुखाची मागणी; महिलेने कार्यालयातच अंगावर पेट्रोल ओतले

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः एका डेपो मॅनेजरने पीएमपीएलच्या महिला वाहकाकडे शरीर सुखाची मागणी केल्याची घटना पुण्यात घडली आहे. डेपो मॅनेजरच्या जाचाला कंटाळून संबंधित महिला वाहकाने कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डेपो मॅनेजर शरीर सुखासाठी पीडितेला त्रास देत होता. एका वाहक आणि चालकाच्या मदतीने डेपो मॅनेजर पीडितेला त्रास देत होता. विशेष म्हणजे याप्रकरणी पीडिता महिला वाहकाने बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे. तसेच महिला आयोगाकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र डेपो मॅनेजरविरोधात द्यात कोणताच गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे महिला वाहकाने मॅनेजरच्या कार्यालयात जात अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संजय कुसाळकर, असे त्रास देणाऱ्या डेपो मॅनेजरचे नाव आहे. महिला वाहकाचा पाठलाग केल्याबाबत कुसाळकरविरुद्ध समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेपो मॅनेजर संजय कुसाळकरने यापूर्वीही एका महिलेला त्रास दिला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा देखील दाखल आहे. पीडितेला त्रास देण्यासाठी डेपो मॅनेजरला वाहक सुनील भालेकर आणि चालक सुधीर राठेड मदत करत होते. भालेकर याने मानसिक त्रास दिला. त्याने महिलेचे फोटो व्हायरल केले. तसेच पाठलाग देखील करायचा. तर सुधीर राठेड हा कॉल करून संबंधित महिला वाहकाला शिव्या देत होता.

दरम्यान महिला वाहकाने महिला आयोग आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. पीएमपीएलच्या वरिष्ठांकडेही याप्रकरणी वेळोवेळी तक्रार केली. मात्र त्याची दखल घेत जात नसल्याने अखेर या महिला वाहकाने संजय कुसाळकर यांच्या केबिनमध्ये असलेले पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आणखी एक विशेष म्हणजे पीएमपीएलच्या वरिष्ठांकडे डेपो मॅनेजरविरोधात तक्रार केल्यानंतर मॅनेजरने सदर महिला कर्मचाऱ्याला निलंबित केले.

याप्रकरणी महिला वाहकाने दिलेल्या तक्रारीनुसार, डेपो मॅनेजर संजय राजाराम कुसाळकर हा त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून त्रास देत होता. काम करत असताना डेपो मॅनेजर वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत होता. कधी अवघड ड्युटी लावणे, उशिरा सुटणाऱ्या गाड्या देणे, एवढेच नाही तर चेहऱ्यावर रुमाल बांधून संजय कुसाळकर हा महिलेचा पाठलाग देखील करत असे. पाठलाग करत महिलेला थांबवून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करायचा. जर माझी इच्छा पुर्ण केली, तर त्रास होणार नाही. लोडच्या गाड्या करायची गरज उरणार नाही, असे डेपो मॅनेजर कुसाळकर सांगायचा, असे या महिला कर्मचाऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments