Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पीएमआरडीए पदभरतीला लागणार वर्षभराचा कालावधी

पीएमआरडीए पदभरतीला लागणार वर्षभराचा कालावधी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : कंत्राटी मनुष्यबळावर कामकाज सुरू असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए ) करण्यात येणाऱ्या पदभरती प्रक्रियेला वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पीएमआरडीएमध्ये ४०७ पदांचा आकृतीबंध मंजूर झाला आहे. पीएमआरडीएच्या आस्थापनेवर तसेच करार पद्धतीने आणि प्रतिनियुक्तीने अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून ३१ मार्च २०१५ रोजी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएची स्थापना झाली. तेव्हापासून पीएमआरडीएमार्फत आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम तयार करण्याचे काम सुरू होते. आकृतीबंध तयार करून शासनाकडे पाठविल्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये शासनाच्या प्राधिकरण कार्यकारी समितीकडून त्यास मान्यता मिळाली. त्यानंतर राज्य शासनाने आकृतीबंध मंजूर केला.

प्रतिनियुक्तीवरील मोजके अधिकारी वगळले तर पीएमआरडीएचा संपूर्ण कारभार सात वर्षे कंत्राटी मनुष्यबळावर विसंबून होता. मात्र, गेल्या वर्षी पीमआरडीएचा ५७ संवर्गाचा आणि एकूण ४०७ पदसंख्येचा हा आकृतीबंध मंजूर झाला. यापैकी काही पदे सरळ सेवेने, तर उर्वरित पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने भरली जातील. आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता याबाबत सेवा प्रवेश बनविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. हे सेवा प्रवेश राज्य सरकारला सादर करून त्यासाठी मंजुरी घेतली जाणार आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर पीएमआरडीएला सरळसेवा आणि प्रतिनियुक्तीने आवश्यक पदे भरता येणार आहेत. पीएमआरडीएमध्ये सध्या प्रतिनियुक्तीवर गट अ – ३५, गट ब २१ आणि गट क – १६ जागांवर अधिकारी, कर्मचारी नियुक्त केलेले आहेत.

कामकाजात होणार सुधारणा

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील १० तालुक्यांमधील ८१७ गावांचा एकूण ७ हजार २५६ चौरस किलोमीटर परिसर पीएमआरडीएमध्ये समाविष्ट आहे. पीएमआरडीए हद्दीत मोठा औद्योगिक पट्टा असल्याने नागरिकरण वाढत आहे. यासह मेट्रो, रिंगरोडसारखे प्रकल्प पीएमआरडीएने हाती घेतले आहेत. या प्रकल्पांसह नियमित कामकाज अधिक नियोजनबद्धपणे होण्यास मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments