Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजपिस्तुल बाळगणाऱ्या सराईतला अटक; सिंहगड पोलिसांची कामगिरी

पिस्तुल बाळगणाऱ्या सराईतला अटक; सिंहगड पोलिसांची कामगिरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील सिंहगड परीसरातुन गुन्हेगारीशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. येथे देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका सराइताला बेड्या ठोकल्या आहेत. सिंहगड रस्ता पोलिसांच्या तपास पथकाने कारवाई करत सराईताकडून पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त केली आहेत. साहिल मार्तंड साखरे (वय 23, रा. दांगट चाळ, साई चौक, वडगाव बुद्रुक) असे अटक केलेल्या सराइताचे नाव आहे. यापूर्वीही संहिल याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड पोलिस कर्मचारी सागर शेडगे आणि देवा चव्हाण हे गस्त घालीत असताना त्यांना साहिल याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. तसेच तो सिंहगड रस्त्यावरुन जात असल्याचे त्यांना आपल्या बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्यानंतर सिंहगड पोलिसांनी सापळा लावून त्याला पडकले. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्याच्याकडून एक पिस्तूल तसेच दोन काडतुसे जप्त केली आहेत. साहिलने पिस्तूल कोणाकडून घेतले? याचा तपास पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, संजय शिंदे, उत्तम तारु, अण्णा केकाण, विकास बांदल, गणेश झगडे, अमोल पाटील, निलेश भोरडे, राहुल ओलेकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments