Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज पिस्तुलाचा धाक दाखवून पुण्यात पोलिसानेच केला महिला पोलिसावर बलात्कार

पिस्तुलाचा धाक दाखवून पुण्यात पोलिसानेच केला महिला पोलिसावर बलात्कार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढून जेवणासाठी घरी येत असताना गुंगीचे औषध देऊन पोलीस शिपायाने महिला पोलीस कर्मचाऱ्यावर त्याने अत्याचार केला. त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी खडक पोलिसांनी दीपक सिताराम मोघे या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल केला आहे. मोघे हा सध्या मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहे. याबाबत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार स्वारगेट पोलीस वसाहत तसेच खडकवासला येथील लॉजवर २०२० ते १ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही शहर पोलीस दलात नेमणूकीला असून स्वारगेट पोलीस वसाहतीत राहतात. लॉकडाऊनच्या कालावधीत आरोपी दीपक मोघे याने फिर्यादी महिलेशी ओळख वाढविली. या काळात त्यांच्या घरी जेवणास तो जात होता. त्या दरम्यान त्याने कोल्ड्रींकमधून फिर्यादीला गुंगीकारक औषध दिले. त्यामुळे फिर्यादीस उलट्यांचा त्रास होऊ लागला. तेव्हा त्याने फिर्यादीला गोळ्या खाण्यास दिल्या. त्यामुळे आणखी गुंगी येऊन त्यांना झोप लागली. तेव्हा त्याने फिर्यादीसोबत शारीरीक संबंध केले. त्याचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

तसेच फिर्यादीचे पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या घरातील कपाटातील ५ ते ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, डोंगल व मोबाईल अशा सर्व वस्तू जबरदस्तीने घेऊन गेला. खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक तोटेवार तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments