Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपिस्टलसह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तिघांना बेड्या: कोंढवा पोलिसांची कारवाई;

पिस्टलसह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तिघांना बेड्या: कोंढवा पोलिसांची कारवाई;

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिस्टलसह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तिघा सराईत आरोपीना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ पिस्टल आणि ६ काडतुसे जप्त करण्यात आले आहे.

प्रफुल्ल निवृत्ती निकम (वय ४१, रा. साकुर्डी, ता. कराड, जि. सातारा), सिमोन रोमियो मिरिंडा (वय-२५, माझीवडा गाव, ठाणे वेस्ट), समीर भगवान संकपाळ (वय-२५, मोप्रे, ता. कराड, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल गारवा मध्ये तीन जण येणार असून त्यांच्याकडे पिस्टल सारखी वस्तू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील आणि पोलीस हवालदार विशाल मेमाणे यांना मिळाली होती. यानंतर कोंढवा पोलिसांच्या वतीने पाहणी केली असता गारवा हॉटेलच्या बाजूला असणाऱ्या सोसायटीच्या समोरील कम्पाऊंड मध्ये एक कार थांबल्याची दिसली. सापळा रचून आरोपी प्रफुल्ल निकम, सिमोन रोमियो मिरिंडा, समीर भगवान संकपाळ यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता २ देशी बनावटीचे पिस्टल, ६ जिवंत काडतुसे, एक कार असा २ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे रेकॉर्वरील गुन्हेगार असून त्यांच्यावर पाटण, कराड, कासारवाडी, नवापाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, लेखीजी शिंदे, आणि पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, सतीश चव्हाण, लवेश शिंदे, शाहिद शेख, लक्ष्मण होळकर आदींच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments