इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नारायणगाव : जुन्नर तालूक्यातून एक अपघाताची बातमी समोर
आली आहे. ओतुरकडुन नारायणगावच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप गाडी व नारायणगावकडुन ओतुरचं दिशने येणाऱ्या फियाट लिना कार यांची समोरासमोर जोरदार धडक होवुन अपघात होऊन झाला आहे. यामध्ये जुन्नर तालुक्यातील आळू येथील जिल्हा परिषद प्रथमिक शाळेतील विद्यार्थी आणि पालक असे २० जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी व पालक हे शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रमाकरीता खोडद ता. जुन्नर येथे जात असताना अपघात झाला असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. ओतुर-नारायणगाव रस्त्यावरील धोलवड रोड येथे शुक्रवार (दि. ७) रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.
ओतुर बाजुकडुन नारायणगाव बाजुने जाणाऱ्या पिकअप गाडी (क्र. एम.एच १४ जि.यू १५६६) व नारायणगाव बाजुकडुन ओतुर बाजुने येणाऱ्या फियाट लिना कार (क्र. एम.एच १२ जी. एफ ०८६०) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. पिकअपमध्ये जिल्हा परिषद प्रथमिक शाळेतील विद्यार्थी व पालक होते. ते जखमी झाले आहेत. हे सार्वजण शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रमाकरीता खोडद येथे जात असताना हा अपघात झाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पुढील तपास ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस करत आहोत.