Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपिंपळवंडी येथे दिवसा चोरी... तीन दिवसात चौथी चोरी

पिंपळवंडी येथे दिवसा चोरी… तीन दिवसात चौथी चोरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपळवंडी : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील शिंदे-बाम्हणे मळ्यातील देवराम बाम्हणे यांच्या घरी सोमवारी (ता.१८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरी झाली. घरात वृद्ध दांपत्य असताना हि चोरी झाली असुन कपाटातील सोन्याचे दागिने चोरीस गेले असल्याची माहिती आळेफाटा पोलीसांनी दिली.

देवराम बाम्हणे (वय ९०) हे त्यांच्या घराच्या ओट्यावर बसले असता एक अज्ञात व्यक्ती दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून घरा समोर आला व बाजूला बसला त्यानंतर तुमची सून राजुरीची आहे ना तुम्ही मला ओळखत नाही का हे बोलून मला पावती घेण्यासाठी मामाने पाठवले आहे.

असे बोलुन ती व्यक्ती मोबाईल कानाला लावुन घरात घुसली व कपाटात असलेले सोन्याचे दागिने चोरले. त्यानंतर मला पावती मिळाली असे बोलुन निघुन गेला. देवराम बाम्हणे हे त्यांच्या मागे गेले असता वृद्धावस्थेमुळे त्यांना घरात लवकर जाता आले नाही तेवढ्यात ती व्यक्ती सोने घेऊन दुचाकीवरून निघुन गेली होती.

यात चार तोळे वजनाचे दोन मंगळसुत्र, एक अंगठी व एक नथ असे एकुण दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे सोने चोरून नेले. देवराम बाम्हणे यांचे नातु ओंकार भास्कर यांनी सांगितले की मी माझ्या कपड्यांच्या दुकानावर तसेच आई व वडील हे शेतीत कामासाठी गेले असता घरी आज्जी व आजोबा असताना हि चोरी झाली. आई शेती कामावरून घरी आल्यावर तिने कपाटातील सोने चोरीला गेले असल्याचे मला सांगितले.

ओंकार बाम्हणे यांनी आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असुन. पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर आळेफाटा पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

पिंपळवंडी येथे दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या दरम्यान घरातील सदस्य घरात असताना घराचे दरवाजे तोडुन तीन ठिकाणी चोरी झाली होती. हि घटना ताजी असतानाच भर दिवसा झालेल्या या चोरी मुळे पिंपळवंडी पंचक्रोशी मध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

ग्रामपंचायतीचे पोलिसांना निवेदन

सरपंच मेघा काकडे, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक विवेक काकडे, उपसरपंच मयुर पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप लेंडे, सचिन ठाणेकर, निखिल दांगट, राजेश काकडे यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांची भेट घेऊन त्यांना पिंपळवंडी परिसरातील वाढत्या चोऱ्यांबाबत उपाययोजना कराव्यात यासाठी निवेदन दिले.

यावेळी संचालक विवेक काकडे यांनी सांगितले की पिंपळवंडी येथे असलेल्या पोलीस दुरक्षेत्र केंद्रात कायमस्वरूपी हवालदाराची नेमणुक करण्यात यावी. पिंपळवंडी हे गाव भौगोलीक दृष्ट्या तालुक्यातील सर्वात मोठे गाव असुन यापुर्वी गावात व गावातील वाड्यांमध्ये ग्रामसुरक्षा दल कार्यरत होते ते पुन्हा कार्यरत करण्यासाठी आळेफाटा पोलीसांनी पुढाकार घ्यावा.

यावेळी पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले की पिंपळवंडी परिसरात झालेल्या चोरीचा पोलीस योग्य प्रकारे तपास करत असुन घरात अनोळखी सदस्य आल्यास कोणावर लवकर विश्वास न ठेवता लवकरात लवकर याची माहिती पोलिसांना देण्यात यावी व सतर्क राहावे. लवकरच पिंपळवंडी परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन ग्रामसुरक्षा दल पुन्हा कार्यरत करण्यात येईल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments