Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पिंपरी चिंचवड शहरात कोविडचे ३० रुग्ण; बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह वैद्यकीय यंत्रणा सज्ज

पिंपरी चिंचवड शहरात कोविडचे ३० रुग्ण; बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह वैद्यकीय यंत्रणा सज्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. गेल्या महिन्याभरात ३० जणांना कोरोनाची लागण झाली. तर मंगळवारी (दि. २) ३५३ संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३ जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. लागण झालेल्या सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. केवळ चार रुग्णांना रुग्णालयात भरती केले होते. तर बाकी सर्व रुग्णांवर घरीच उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक ३० रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास महापालिकेच्या रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह सर्व तयारी आहे. मात्र, सध्याच्या कोरोना रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळत आहे. विशेष म्हणजे आढळलेला एकही रुग्णामध्ये जेएन. १ या नव्या व्हेरियंटची लागण झालेली नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही. कोरोना संशयित रुग्णांचे नमुने घेऊन चाचणीही करण्यात येत आहे. ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार आहेत, त्यांनी स्वतःहून गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावे. सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

 

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments