Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपिंपरी-चिंचवड शहरातील पवार, राजपुत, ढमाले टोळीतील 20 गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांची 'मोक्का' कारवाई

पिंपरी-चिंचवड शहरातील पवार, राजपुत, ढमाले टोळीतील 20 गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांची ‘मोक्का’ कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात दहशत निर्माण, शररिराविरुद्ध, मालाविरुद्ध गुन्हे करणारे तसेच खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी चालु वर्षात 16 सराईत गुन्हेगारी टोळ्यांपैकी 87 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

शहरातील पवार, राजपुत आणि ढमाले या तीन टोळीतील 20 सराईत गुन्हेगारांवर मोक्का कारवाई केली आहे. या गुन्हेगारांनी चाकण, हिंजवडी आणि वाकड परिसरात गंभीर गुन्हे करून दहशत पसरवल्याचे उघड झाले आहे.

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवार टोळीतील पाच जणांवर मोक्का कारवाई केली आहे. यामध्ये टोळी प्रमुख राहुल संजय पवार (वय-33 रा. म्हाळुंगे इंगळे, ता. खेड), अजय अरुण गायकवाड (वय-24 रा. भोसले वस्ती, म्हाळुंगे इंगळे), अमर नामदेव शिंदे (वय-32 रा. कासार आंबोली, ता. मुळशी), अभिजीत उर्फ अभि चिंतामण मराठे (रा. कोथरुड), आशु उर्फ आसिफ हैदर हापसी (वय-25 रा. कासारवाडी, ता. हवेली) यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. तर टोळी प्रमुखासह साथीदारांवर 14 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

तसेच हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजपुत टोळीचा प्रमुख सचिन तानाजी राजपुत (वय-26 रा. कासार आंबोली, ता. मुळशी), अरुण कैलास राजपुत, राजेश हरिश्चंद्र राजपुत, बालाजी हरिश्चंद्र राजपुत यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली असून या टोळीवर 5 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढमाले टोळीचा प्रमुख अभिजीत बाजीराव ढमाले (रा. ढमाले चाळ, जुनी सांगवी), ऋतिक दिलीप चव्हाण (वय-22 रा. महादेव आळी, जुनी सांगवी), प्रेम प्रकाश मोरे (वय-19 रा. जुनी सांगवी), ओमकार पांडुरंग शेंडगे (वय-22 रा. दापोडी), दिपक लुंडा कोकाटे (वय-21 रा. पिंपळे गुरव), रोशन मुरलीधर सोळंकी (वय-23 रा. जुनी सांगवी), कार्तिक चव्हाण, कमलेश पठारे, अनिकेत कांबळे, गणेश ढमाले, निलेश मुदलीयार यांच्याविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे. या टोळीवर 17 गुन्हे दाखल आहे.

पवार, राजपुत आणि ढमाले या तिनही टोळीतील गुन्हेगारांनी चाकण, एमआयडीसी भोसरी, रावेत, निगडी, हिंजवडी, वाकड, सांगवी, भोसरी, कोथरुड, पौड, रोहा, कोलाड, रायगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुन, कट रचुन खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, दरोड्याची तयारी, जबरी चोरी करणे, गंभीर दुखापत, खंडणी, अपहरण, तोडफोड करणे, जीवे ठार मारण्याची धमकी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मोक्का कलमाचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांना सादर करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील कागदपत्रांची पडताळणी करुन गुन्ह्यात मोक्का कलमाचा अंतर्भाव करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments