Tuesday, February 27, 2024
Home क्राईम न्यूज पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. शहरातील एक आमदार आणि खासदारांचेच ऐकून आयुक्त काम करत असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे आयुक्तांची पालकमंत्री ‘दादां’नी मुंबईला बोलावून कानउघाडणी केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत मार्च २०२२ मध्ये प्रशासकीय राजवट सुरू झाली. त्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्ताकाळात प्रशासक तथा आयुक्तपदी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी शहरातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सुचवलेली विकासकामे आणि प्रकल्पांना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. मात्र, दरम्यान, जुलैमध्ये राष्ट्रवादीतील अजित पवार यांचा गट महायुतीमध्ये सहभागी झाला आणि पवार उपमुख्यमंत्री झाले. काही दिवसांनंतर पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे आली. परिणामी महापालिकेत पवार विरुद्ध भाजप- शिवसेनेचे स्थानिक नेते असा सुप्त संघर्ष निर्माण झाला. या राजकीय अस्थिरतेचा फायदा प्रशासनाने घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे अधिकारीही ‘हम करे सो कायदा’ अशा भूमिकेत आहेत. त्यात आयुक्तांचा अंकुश नसल्याने अधिकारीही कोणाचे ऐकत नसल्याचे चित्र आहे.

अधिकारी कोणाच्या कानाला लागतात?

महापालिका आयुक्त शेखर सिंह रूजू झाल्यानंतर काही महिन्यांतच त्यांची बदली होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आयुक्तांनी सत्तेतील दोन्ही दादांशी जुळवून घेतल्याने बदली थांबल्याचे बोलले जाते. महापालिकेतील अधिकारी आयुक्तांनी काम सांगितले की, आमदार आणि खासदारांच्या घरी जाऊन आयुक्तांच्या तक्रारी करतात. काहींनी तर झालेल्या बदल्याही रद्द करून घेतल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांचाही नाईलाज होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

RELATED ARTICLES

पुण्यातील नशेचा हादरवणारा व्हिडिओ, वेताळ टेकडीवर नशेत गुंग तरुणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) प्रत्येक पुणेकरांना विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर उडता पंजाब होईल, नशेचे माहेरघर होईल,...

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा...

पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पुण्यातील नशेचा हादरवणारा व्हिडिओ, वेताळ टेकडीवर नशेत गुंग तरुणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) प्रत्येक पुणेकरांना विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर उडता पंजाब होईल, नशेचे माहेरघर होईल,...

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा...

पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार...

पुण्यातील तरुणाई ड्रग्सच्या नशेत? रमेश परदेसींकडून हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक (Pune Drugs) आणि राज्याला हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील...

Recent Comments