इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेचा वृक्ष संवर्धन विभागाचा 2025 26 या वर्षाचा 57 कोटी 36 लाख 86 हजार रुपयांचा अर्थसंकल्प अखेर मंजूर झाला आहे. वृक्षसंवर्धन विभागाने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील रक्कम विविध उपक्रम विकास कामांसाठी खर्च करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महापालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागाने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील रक्कम ही कार्यालयीन खर्चासह फळाफुलांचे प्रदर्शन भरविणे, झाडांचे पुनर्रोपण करणे, पिंजरे खरेदी व दुरुस्ती करणे, वृक्षगणना करणे, तार कुंपण देखभाल दुरुस्ती करणे, विविध उद्यानांची देखभाल दुरुस्ती करणे, गायरान व मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण तसेच संवर्धन करणे, नर्सरी साहित्य खरेदी करणे या कामासाठी वापरली जाणार आहे.
महापालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाच्या २०२५-२६ या वर्षाच्या ५७कोटी ३६ लाख ८६ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. दरम्यान किवळे येथे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. कासारवाडी येथील महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याच्या कामाला आयुक्तांनी मान्यता दिली आहे.