Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजपिंपरी चिंचवड महापालिकेच्या दोन आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दोन आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : मागील तीन वर्षापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. अनेक नागरिक कामासाठी महापालिकेत येतात मात्र अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याने त्यांना भेटण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. आता याचप्रकरणी महापालिकेच्या दोन अतिरिक्त आयुक्तांसह 34 अधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सामान्य प्रशासन विभागाच्या तपासणी पथकाच्या पाहणीत नागरिकांना भेटीसाठी राखीव ठेवलेल्या आठवड्यातील तीन दिवसांच्या वेळेत दोन अतिरिक्त आयुक्तांसह ३४ वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर त्यांनीमहापालिकेत विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना भेटण्यासाठीच्या अधिकाऱ्यांच्या वेळा निश्चित केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे.

त्याचबरोबर आयुक्त शेखर सिंह यांनी आयुक्तांसह अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आहेत. सर्व विभाग प्रमुखांनी कार्यालयीन कामकाजासाठी भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी दुपारी तीन ते सायंकाळी सहा ही समान वेळ राखीव ठेवावी. या कालावधीत विभाग अंतर्गत बैठका, प्रकल्प भेटीचे आयोजन करू नये. भेटीचा कालावधी सूचना फलकांवर ठळकपणे प्रदर्शित करावा. प्रत्येक नागरिकांचे म्हणणे पुरेसा वेळ देऊन ऐकून घ्यावे. त्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे स्पष्ट त्यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments